CSMT स्थानकावर बॉम्ब असल्याची धमकी, एक ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai CSMT Bomb Threaten

CSMT स्थानकावर बॉम्ब असल्याची धमकी, एक ताब्यात

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि कुर्ला रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन मुंबई पोलिसांना (Mumbai Police) आला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी केलेल्या पाहणीत काहीही संशयास्पद आढळून आले नाही.

हेही वाचा: निलेश राणेंच्या सडेतोड टिकेला मुंबई पोलिस आयुक्तांचा खुलासा

रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक फोन आला होता. त्यानंतर लगेच रेल्वे स्थानकावर जाऊन तपासणी केली. पण, तपासणीमध्ये काहीही संशयास्पद आढळून आले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरायचे काहीही कारण नाही. तसेच हा फोन करणारी व्यक्ती कोण आहे? याची चौकशी केली असता त्याची ओळख पटली आहे. ती व्यक्ती मध्य प्रदेशातील जबलपूरची असल्याचे समजल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले अशी माहिती आहे.

पोलिसांना फसवा फोन केल्यास काय होतं? -

पोलिस नियंत्रण कक्षाला काही १०० डायलवर फेक कॉल येत आहेत. त्यामळे पोलिस त्रस्त आहेत. अनेकदा केवळ गंमत म्हणून पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल लावण्यात येतो. घटना घडल्याची खोटी माहिती देण्यात येते. पोलिस तातडीने घटनास्थळावर जातात, तेव्हा तेथे शांतता असते. फोन करणारा व्यक्तीही हजर नसतो. पोलिसांना केवळ त्रस्त करण्यासाठी काही जण कॉल करतात. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून आता पोलिस थेट गुन्हे दाखल केले जातात.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CSMT
loading image
go to top