Mumbai : व्हिडिओ कॉल करून मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai : व्हिडिओ कॉल करून मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी

Mumbai : व्हिडिओ कॉल करून मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई : मुंबईला बॉम्बने उडवण्याची निनावी धमकी दिली आहे. सांताक्रूझ येथील एका रहिवाशाला व्हिडिओ कॉल करून एका अज्ञाताने मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली असून याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांताक्रूझ येथील एका रहिवाश्याला एका व्यक्तीकडून व्हिडिओ कॉल आला आणि मुंबईला बॉम्बने उडवणार असल्याची धमकी दिली आहे. त्यानंतर या नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा: भारताला 2047 पर्यंत मुस्लीम राष्ट्र बनवण्याचं PFIचं उद्दिष्ट; आरोपीचा मोठा खुलासा

दरम्यान, याअगोदर अनेकवेळा कॉल करून मुंबई उडवण्याच्या धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तर सामान्य व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून धमकी दिल्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे.

Web Title: Bomb Threat To Bombay Video Call

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewscrimeTerrorist