Elgar Parishad-Maoist links case: एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात गौतम नवलखा यांना जामीन मंजूर

31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात प्रक्षोभक विधाने करण्यात आली होती, त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा युद्ध स्मारकाजवळ हिंसाचार उसळला होता.
Elgar Parishad-Maoist links case
Elgar Parishad-Maoist links case

Elgar Parishad-Maoist links case: एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने कार्यकर्ता गौतम नवलखा यांना जामीन मंजूर केला. एल्गार परिषद प्रकरणी मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांना अटक करण्यात आली होती. त्यांना मुंबईच्या तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले होते, परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने 10 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.

मात्र, गौतम नवलखा यांच्या नजरकैदेला एनआयएने विरोध केला होता. न्यायालयाने गौतम नवलखा यांना नजरकैदेत तैनात केलेल्या पोलिसांचा खर्च म्हणून २.४ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने नवलखा यांना पोलिसांचा खर्च म्हणून आणखी आठ लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. (Latest Marathi News)

31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात प्रक्षोभक विधाने करण्यात आली होती, त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा युद्ध स्मारकाजवळ हिंसाचार उसळला होता.

Elgar Parishad-Maoist links case
Sharmila Thackeray: ''तुम्ही लहान भावालाही टोमणे मारण्याची संधी सोडत नाहीत'', शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

कोण आहे गौतम नवलखा?

ग्वाल्हेरमध्ये जन्मलेले नागरी हक्क कार्यकर्ते पीपल्स युनियन ऑफ डेमोक्रॅटिक राइट्स (PUDR) चे सक्रिय सदस्य आहेत. मुंबईध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचे प्रशिक्षण घेतलेले, ६५ वर्षीय नवलखा यांनी अटक होण्यापूर्वी न्यूजक्लिक या डिजिटल न्यूजपोर्टलमध्ये काम केले. ते 30 वर्षांहून अधिक काळ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली या शैक्षणिक जर्नलमध्ये होते. ते डेज अँड नाईट्स इन द हार्टलँड ऑफ रिबेलियन या पुस्तकाचे लेखक देखील आहेत.

Elgar Parishad-Maoist links case
MPs Suspended : 'या' चार विधेयकांवर चर्चा नको होती म्हणून...; सुप्रिया सुळेंनी सांगितलं निलंबनामागचं कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com