गृहमंत्री देशमुखांविरोधातील याचिकेवर हायकोर्ट पाच एप्रिलला देणार आदेश

parambir-singh.jpg
parambir-singh.jpg

मुंबई: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय येत्या पाच एप्रिलला आदेश देणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अन्य काहींनी गृहमंत्री देशमुखांविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ३१ मार्च रोजी निर्णय राखून ठेवला होता. 

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुखांवर वसुलीचा आरोप केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रातही त्यांनी तोच आरोप केला होता. त्याशिवाय गृहमंत्री पोलीस तपासात हस्तक्षेप करतात, असेही त्यांनी म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरुन त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो कार सापडली. या प्रकरणात एनआयएने सचिन वाझेला अटक केल्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्यानंतर या सर्व प्रकरणात बदलीची कुऱ्हाड परमबीर सिंह यांच्यावर कोसळली. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन बदलीच्या निर्णयालाही त्यांनी आवाहन दिले आहे.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com