सुशांतसिंह आत्महत्यावेळी केलेले वार्तांकन कायद्याचे उल्लंघन करणारे: उच्च न्यायालय

सुशांतसिंह आत्महत्यावेळी केलेले वार्तांकन कायद्याचे उल्लंघन करणारे: उच्च न्यायालय

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात प्रसिद्धी माध्यमांमध्ये करण्यात आलेले वार्तांकन केबल कायद्याचे उल्लंघन करणारे आहे, असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला आहे. रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ यांनी मुंबई पोलिसांविरोधात तपास कामाबाबत केलेली टिप्पणी प्रथमदर्शनी अवमानकारक दिसत आहे, असा शेराही न्यायालयाने मारला आहे. मीडिया ट्रायल ही न्यायदानात होणारा नियमबाह्य हस्तक्षेप होऊ शकतो, असेही न्यायालय म्हणाले.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरू झालेल्या मीडिया ट्रायल विरोधात करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर सोमवारी मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने निकालपत्र जाहीर केले. दोन्ही चॅनलचे काही वार्तांकन सक्रुतदर्शनी अवमानकारक असले तरी त्यांच्यावर कारवाई करत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. 

हत्या आणि आत्महत्येच्या प्रकरणात संवेदनशील वार्तांकन हवे आणि तपासाबाबत महत्त्वाची माहिती जाहीर होता कामा नये, आत्महत्या करणारी व्यक्ती कमजोर होती असे दर्शविणारे वार्तांकन टाळावे, तपासाबाबत निष्कर्षात्मक चर्चा, नाट्यमय रुपांतर टाळावे इ. निर्देश न्यायालयाने दिले आहेत. माध्यमांना माहिती देण्यासाठी एका जबाबदार पोलिस अधिकिर्याची नियुक्ती करावी, ही अॅड दातार यांनी केलेली सूचना खंडपीठाने ग्राह्य धरली आहे. जोपर्यंत संबंधित विभागाकडून नवी नियमावली येत नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉनिक चॅनलसाठी प्रेस कौन्सिलचे नियम बंधनकारक आहेत, असे खंडपीठाने निर्देश दिले.

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांसह वकिल असीम सरोदे यांनी न्यायालयात याबाबत याचिका केली आहे. तसेच सामाजिक संस्थेसह अन्य एक याचिकाही याप्रकरणात करण्यात आल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचे वार्तांकन करताना काही न्यूज चॅनल बेजबाबदारपणे आणि पोलिस तपासात हस्तक्षेप करणारे भडक वार्तांकन करीत आहेत, असा आरोप याचिकेत केला आहे. न्यूज चॅनलवर मार्गदर्शक तत्वे लावण्याची आणि त्यांच्यावर सरकारने अंकुश ठेवण्याची गरज आहे, असे याचिकादारांचे म्हणणे आहे. तर माध्यमांसाठी पुरेशी मार्गदर्शक तत्वे आहेत, नव्याने तयार करण्याची आवश्यकता नाही असा दावा केंद्र सरकारने केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माध्यमांवर अंकुश नको, अशी माध्यमांची भूमिका आहे.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bombay HC on Sushant Singh Rajput Media trial electronic media guidelines

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com