

Court Clerk-Typist Exam Cancelled
ESakal
मुंबई : राज्यात विविध परीक्षांबाबत गोंधळ सुरू असताना, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिकपदाची १६ ऑगस्टला झालेली टंकलेखन परीक्षासुद्धा रद्द करण्यात आली. परीक्षेवेळी उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा रद्द करून लवकरच नव्याने तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती उच्च न्यायालयाने जारी केली.