Mumbai High Court: मुलात आणि पालकांच्या नात्यात प्रेम नसल्याने कोर्टाने अडॉप्शन केले रद्द

The boy is aggressive. We don't bond with him. The parents requested the institution to cancel the adoption.
Mumbai High Court adoption
Mumbai High Court adoptionsakal

Adoption News: आई वडील आणि मूल या नात्याची तुलना कोणत्याही नात्यासोबत करता येत नाही. अनेक जोडप्यांना आई बाबा होण्याचे सुख मिळत नाही म्हणून ते लहान मुलांना दत्तक घेतात.

मात्र दत्तक घेतलेल्या मुलात आणि पालकांच्या नात्यात मायेचा ओलावाच निर्माण होऊ न शकल्याने अॅडॉप्शन रद्द करण्याची वेळ मुंबई उच्च न्यायालयावर आली आहे.

Mumbai High Court adoption
Adopted Child: दत्तक संततीसाठी कोणती जात ग्राह्य धरली जाते?

पाच महिन्यांपूर्वीच या मुलाला पालकांनी बाळ आशा संस्थेकडून दत्तक घेतले होते. मात्र मुलगा आक्रमक आहे. आमचे त्याच्यासोबत बाँडिंग जमत नाही. हे अॅडॉप्शन रद्द करा, अशी विनंती पालकांनी संस्थेकडे केली.

अॅडॉप्शन रद्द करायचे असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार प्रतिज्ञापत्राद्वारे संस्थेने हे अॅडॉप्शन रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली. न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या एकल पिठासमोर प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी संस्थेच्या वतीने बाजू मांडताना न्यायालयाला सांगण्यात आले की, अॅडॉप्शन रद्द करण्यापूर्वी आम्ही पालकांना समुपदेशन करून घेण्याचा सल्ला दिला.

Mumbai High Court adoption
Adoption : आधाराश्रमातील ‘आशी’ला मिळाले अमेरिकन पालक!

त्यानंतरही पालक आपल्या निर्णयावर ठाम असून हे अॅडॉप्शन रद्द करावे अशी मागणी करत आहेत. अॅडॉप्शन रद्द केल्यास या मुलाला नवीन पालक मिळण्यासाठी पुन्हा दत्तक प्रक्रिया करता येईल. इतकेच नव्हे तर मुलगा कचऱ्याच्या डब्यातील अन्न खायचा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याची रक्त चाचणी करण्यात आली.

तेव्हा त्याला मधुमेहाशी संबंधीत आजार असल्याचे निदान झाले. त्याच्यासोबत आमचे बाँडिंग जमत नसल्याचे पालकांनी म्हटले आहे. न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी संस्थेची विनंती मान्य केली. मुलाचे हित बघता अॅडॉप्शन रद्द केले जात असून मुलाच्या नावे पालकांनी केलेली दोन लाख रुपयांची गुंतवणूक पालकांना परत करावी, असे निर्देश देत याचिका निकाली काढली.

Mumbai High Court adoption
baby adoption: मुलं दत्तक घ्यायचे आहे? वाचा संपूर्ण प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com