

Bombay High Court Questions FDA Action And Revokes Navi Mumbai Restaurant License Suspension Order
sakal
मुंबई : फेरतपासणीअंती नवी मुंबईतील एक बार आणि रेस्टॉरंट शंभर टक्के नियमांचे, निकषांचे पालन करत असल्याचे आढळून आल्यानंतरही परवाना निलंबनाचा आदेश रद्द न केल्यामुळे उच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनावर (एफडीए) पुन्हा नाराजी व्यक्त केली. तसेच यासंदर्भात दंड का आकारला जाऊ नये, अशी विचारणा करून रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्याचे ‘एफडीए’चे आदेशही रद्दबातल ठरविले आहेत.