
मुंबई : दादर येथील महापौर बंगल्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाबाबतच्या धोरणात्मक निर्णयाला आव्हान देण्याचे वैध कारण आढळले नसल्याचे नमूद करून उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. १) सरकारच्या निर्णयात हस्तक्षेपास नकार दिला. तसेच निर्णयाला आव्हान देणाऱ्या २०१७ पासून प्रलंबित असलेल्या विविध याचिका फेटाळून लावल्या. न्यायालयाच्या या निर्णयामुळे स्मारकाची मार्गही मोकळा झाला आहे.