

Woman throw purse on judge High Court
ESakal
मुंबई : सुनावणीदरम्यान निकाल विरोधात गेल्याने एका पक्षकार महिलेने चक्क न्यायालयात न्यायमूर्तीवर हातातली पर्स भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उच्च न्यायालयात घडला. घडलेल्या घटनेची तत्काळ दखल घेऊन न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून त्या महिलेला भर न्यायालयातून बाहेर काढले.