Mumbai News: काळू धरणावरील स्थगिती उठवली, नव्याने निविदा काढण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

Mumbai High Court: काळू धरण प्रकल्पाच्या कामाला गेल्या १० वर्षांपासून लागू असलेली अंतरिम स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on: 

मुंबई : जवळपास १० वर्षांपासून काळू धरण प्रकल्पाच्या कामाला दिलेली अंतरिम स्थगिती उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १४) उठवली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रकल्पाच्या कामासाठी नव्याने निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या निविदा प्रक्रियेत मूळ याचिकाकर्त्या एफ. ए. एंटरप्रायझेससह अन्य इच्छुकांना सहभागी होता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com