
Mumbai High Court
ESakal
मुंबई : मुंबई महानगर परिसरात खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने मृत आणि जखमींच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देणारे धोरण तयार करण्याच्या सूचना राज्य सरकार आणि सर्व पालिकांना केली. तसेच अपघातांसाठी कंत्राटदारांना जबाबदार धरून त्यांच्यासह संबंधित पालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.