
मुंबई : सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांतच करण्याचे उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. ३) स्पष्ट केले. मूर्ती विसर्जनामुळे कोणतेही जलस्रोत प्रदूषित होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेशही न्यायालयाने मुंबई महापालिका प्रशासनाला दिले.