Mumbai: मुंबई एअरपोर्ट जवळच्या 48 इमारती होणार जमीनदोस्त, हायकोर्टाने दिला दणका| Bombay High Court | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bombay High Court

Mumbai: मुंबई एअरपोर्ट जवळच्या 48 इमारती होणार जमीनदोस्त, हायकोर्टाने दिला दणका

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवती असलेल्या टोलेजंग इमारतीं पाडल्या जाणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 48 उंच इमारतींचा भाग पाडण्याचे निर्देश मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ठराविक उंचीच्या वरचा भाग ऑर्डरनुसार पाडण्याचा आदेश देण्यात आला आहे.(Bombay High Court Orders To Demolish Portions Of 48 High-Rise Buildings Near Mumbai International Airport)

मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठने ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले त्या इमारांतीचे वीज-पाणी सेवा पुर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. उच्च न्यायालय अधिवक्ता यशवंत शेनॉय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी करण्यात आली आहे. त्यात मुंबई विमानतळाजवळील उंच इमारतींमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.

सुनावणीदरम्यान, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) ने सांगितले की, या संदर्भात वेळोवेळी सर्वेक्षण केले जाते. 2010 मध्ये एकूण 137 अडथळ्यांच्या इमारतींची ओळख पटली. त्यापैकी 163 प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारित करण्यात आले आहेत. त्यापैकी ४८ इमारती तत्काळ पाडण्याची गरज आहे कारण त्यांच्या वतीने कोणतेही अपील दाखल करण्यात आलेले नाही.