

Justice Madhav J Jamdar of the Bombay High Court
esakal
मुंबई : केंद्र सरकारच्या काही निर्णयांविरोधात मोर्चे किंवा आंदोलने आयोजित करणे हे एखाद्या व्यक्तीला हद्दपार करण्यासाठी पुरेसे कारण ठरू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. एका राजकीय कार्यकर्त्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी जारी केलेला हद्दपारीचा आदेश रद्द करताना न्यायालयाने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर भर देत पोलिसांच्या कारवाईवर कठोर टिप्पणी केली.