बेकायदा बांधकाम खपवून घेणार नाही, औद्योगिक शेडला संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार
Bombay High Cout: कोणतेही बेकायदा बांधकाम खपवून घेणार नाही तसेच त्याला संरक्षणही देणार नाही, असे नमूद करत उच्च न्यायालयाने औद्योगिक शेडला संरक्षण देण्यास नकार दिला.
मुंबई : कोणतेही बेकायदा बांधकाम खपवून घेणार नाही किंवा त्याला संरक्षणही देणार नाही, असे नमूद करत उच्च न्यायालयाने नुकतेच कुर्ला बैल बाजार परिसरातील औद्योगिक शेड पाडण्याबाबत महापालिकेने बजावलेली नोटीस कायम ठेवली.