Mumbai High Court
esakal
उरण : सिडकोने उरणमधील चिर्ले, बेलोंडाखार आणि जांभूळपाडा परिसरातील ७५० हेक्टर जमिनीवर प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कसाठी लागू केलेल्या साडेबावीस टक्के भूखंड वाटप योजनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने महत्त्वाचा निकाल दिला आहे. या निर्णयामुळे संबंधित शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारच्या २०१३च्या भूसंपादन कायद्यानुसार भरीव आर्थिक मोबदला आणि पुनर्वसनाच्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.