

Mandatory for father to bear education and maintenance expenses until marriage.
Sakal
मुंबई : मुलगी सज्ञान (१८ वर्षांची) झाली तरी विवाह होईपर्यंत वडिलांना तिच्या पालनपोषणाची आणि शिक्षणाची जबाबदारी झटकता येणार नाही, असा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिला आहे. अविवाहित सज्ञान मुलगी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम नसेल, तर तिला वडिलांकडून कायदेशीररीत्या पोटगी (Maintenance) मिळवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.