High Court FDA: ‘स्वतःला देव समजत आहात का?’; एफडीएला उच्च न्यायालयाचा थेट सवाल, अधिकाऱ्यांना तुरुंगाचा इशारा

Bombay High Court Slams FDA Officials Over Hasty Action: एफडीएच्या मनमानी कारवाईवर उच्च न्यायालयाचा कडक इशारा; आदेश न पाळल्यास अवमान कारवाई व तुरुंगाची शक्यता
Mumbai High Court

Mumbai High Court

sakal

Updated on

मुंबई: अन्न व सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाई करताना परिस्थितीकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहण्याचे आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांना बजावले. तसे आदेशही दिले तरीही ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी आमच्या आदेशाचे उल्लंघन केले. या अधिकाऱ्यांना सतत फटकारून आम्ही थकलो आहोत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने शनिवारी ‘एफडीए’ला खडे बोल सुनावले. याच कारणास्तव संबंधित अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई का करू नये, हे त्यांनी आम्हाला पटवून द्यावे अन्यथा तुरुंगात जावे, असा इशाराच न्यायालयाने दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com