Mumbai High court
Esakal
मुंबई - नियमबाह्य शिक्षक नियुक्तीला वैयक्तिक मान्यता नाकारण्याचा मुंबई विभागाचे शिक्षण तत्कालीन उपसंचालक संदीप संगवे यांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटी, चिरनेर (ता. उरण, जि. रायगड) येथील शिक्षिकेच्या नियुक्तीशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने याचिकाकर्त्या मंथना रामदास ठाकूर यांची रिट याचिका (क्र. ११२/२०२५) फेटाळून लावली. या निर्णयामुळे शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेत नियमांचे पालन आणि पारदर्शकतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.