काय सांगता!  2030 पर्यंत मुंबई मलेरिया मुक्त?, महापालिकेचा आराखडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काय सांगता!  2030 पर्यंत मुंबई मलेरिया मुक्त?, महापालिकेचा आराखडा

नागरिक आणि महानगर पालिका प्रशासनासाठी ताप ठरलेल्या मलेरियाला 2030 पर्यंत मुंबईतून हद्दपार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

काय सांगता!  2030 पर्यंत मुंबई मलेरिया मुक्त?, महापालिकेचा आराखडा

मुंबई: नागरिक आणि महानगर पालिका प्रशासनासाठी ताप ठरलेल्या मलेरियाला 2030 पर्यंत मुंबईतून हद्दपार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी 100 टक्के लसीकरणाबरोबरच डास उत्पत्ती निर्देशक हा उपक्रमही महानगर पालिकेने हाती घेतला आहे.

कोविडने यंदा हाहाकार उडवला असला तरी पावसाळ्यात मलेरिया, डेंगी, लेप्टो असे आजार महानगर पालिकेची डोकेदुखी ठरतात. पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी 2030 पर्यंत मुंबईला मलेरिया मुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी लसीकरणाबरोबरच मलेरियाच्या डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याचा महत्वाचा प्रकल्प पालिका हाती घेणार आहे. मलेरिया, डेंगी, लेप्टो या आजारांच्या लसीकरणाबाबत संशोधन सुरु आहे. या लस निर्माण झाल्यावर त्या मुंबईतील बालकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लस तयार झाल्यावरच 2030 पर्यंत 100 टक्के बालकांचे लसीकरण करण्याची महानगर पालिकेची योजना असल्याचे अतिरिक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

2019 मध्ये मलेरियाने एकही मृत्यू मुंबईत झाला नव्हता. 2020 मध्ये मलेरियामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 2019 मध्ये डेंगीचे 910 रुग्ण आढळले होते. त्यातील तिघांचा मृत्यू झाला होता. 2020 मध्ये 85 टक्के रुग्णांत घट झाली आहे. 2020 मध्ये डेंगीचे रुग्ण 142च्या आसपास होते. तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोविड काळात मुंबईत आढळणाऱ्या हेपीटायटीस, गॅस्ट्रो, टायफाईड या आजाराच्या रुग्णसंख्येत प्रचंड घट झाली होती. फक्त मलेरियाचे रुग्ण वाढले होते.

हेही वाचा- मुंबईकरांना दिलासा! कोरोनाने होणाऱ्या मृत्यूवर मुंबईकरांची मात
 
बीसीजीचे 100 टक्के लसीकरण

मुंबई महानगर पालिकेने बालकांना विविध लसी दिल्या जातात. त्यात क्षयाला प्रतिरोध करणारी बीसीजी ही लस आहे.पालिका आतापर्यंत 90 टक्के बालकांचे लसीकरण करत आहे. मात्र 2030 पर्यंत 100 टक्के बालकांचे लसीकरण करण्याचे ध्येय महानगर पालिकेने ठेवले आहे. मुंबईत क्षय रोगाचे रुग्ण वाढत आहे. मुंबईत दरवर्षी चार हजार नव्या क्षय रोग रुग्णांची नोंद होते.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bombay municipal corporation plan for Malaria Free Mumbai till 2030