मुंबईकरांना दिलासा! कोरोनाने होणाऱ्या मृत्यूवर मुंबईकरांची मात

मुंबईकरांना दिलासा! कोरोनाने होणाऱ्या मृत्यूवर मुंबईकरांची मात

मुंबई:  मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी... गेल्या चार महिन्यांत शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये 82 टक्के घट झाली आहे. आरोग्य विभाग आणि डॉक्टरांच्या विश्वासनुसार, नवीन केसेस कमी होण्याबरोबरच गंभीर रूग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्वरित तपासणी आणि उपचारांच्या मदतीने डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवण्यात यशस्वी होत आहेत. 

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक परिणाम मुंबईवर झाला राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 11407 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र ऑक्टोबरच्या तुलनेत जानेवारीपर्यंत मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 2020 च्या ऑक्टोबर महिन्यात कोरोना विषाणूमुळे एकूण 1281 रुग्णांचा मृत्यू झाला. जानेवारी 2021 मध्ये 226 रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. यासह जानेवारीत मासिक मृत्यू दर 14 टक्क्यांवरून 2 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी सांगितले की, सध्या मुंबईतील मृत्यूचे प्रमाण 1.4 टक्क्यांवर पोहोचले आहे जे यापूर्वी खूपच जास्त होते. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही बरेच नियोजन केले आणि त्यावर फक्त काम केले नाही तर नवीन रुग्णांची संख्या कमी झाल्याने मृत्यूची संख्याही लक्षणीय खाली आली आहे. 

लोकांची जागरूकता आणि डॉक्टरांचा अनुभव

डॉक्टरांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे मृतांची संख्या कमी करणे हे होते. लोक उपचारासाठी उशिरा येत असत आणि तात्काळ मृत्यूही होत होता. आता जागरूकता वाढली आहे आणि लोक लवकर येतात आणि कोरोनाचा सामना करतात. काही रुग्ण यातून बाहेर येतात तर कोणाचा मृत्यू होतो. पूर्वी बेड, आयसीयू आणि डॉक्टरांना ही अनुभव कमी होता. आता बेड, आयसीयू, ऑक्सिजन आणि डॉक्टरांनाही अनुभव आला आहे. म्हणूनच मृत्यूला आळा घालण्यात यश आले आहे. 

डॉ. अविनाश सूपे, अध्यक्ष, कोविड मृत्यू निरीक्षण समिती आणि संचालक, हिंदुजा रुग्णालय (खार) 

आजारी वृद्धांना धोका कायम

सध्या कोरोना विषाणूमुळे होणार्या मृत्यूंपैकी 80 टक्के मृत्यू मधुमेह, रक्तदाब आणि इतर आजारांसह 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. वृद्ध आणि इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्यांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 

डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

गेल्या 4 महिन्यांतील आकडेवारी

महिना        मृत्यू        मृत्यू दर
ऑक्टोबर - 1281      14.2%
नोव्हेंबर -   535         5.20%
डिसेंबर-    297          2.74%
जानेवारी    226        2.03%

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai people beat corona deaths by 82 percent in 4 months

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com