विद्यार्थ्यांसाठी 20 कोटींचे मास्क, मुंबई पालिकेची मास्क खरेदी वादात अडकणार

समीर सुर्वे
Sunday, 10 January 2021

महानगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तब्बल 20 कोटी रुपयांचे मास्क खरेदी केले जाणार आहे. तशा निविदा मागविण्यात येणार आहे.

मुंबई: महानगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तब्बल 20 कोटी रुपयांचे मास्क खरेदी केले जाणार आहे. तशा निविदा मागविण्यात येणार आहे. मात्र,ही खरेदी दोन वर्षांची गरज लक्षात घेऊन करण्यात येत असल्याचे यावरुन वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

कोविडवर नियंत्रण आल्याने कधीही शाळा नियमित सुरु होतील अशी शक्‍यता आहे. नाहीतर आगामी शैक्षणिक वर्षांपासून शाळेचे वर्ग नियमित सुरु होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किमान सहा महिने मास्क लाववेच लागतील असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महानगर पालिकेने शाळा सुरु करण्यापूर्वी मास्कची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तब्बल 25 लाख मास्क विकत घेण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थ्याला 25 मास्क देण्यात येणार आहे. हे माक्‍स एकाच साईज असून ते विद्यार्थ्यांना ऍडजेस्ट करता येतील. तसेच एक मास्क 30 वेळा धुवून वापरता येतील, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. नगरसेवकांकडून मास्क खरेदीची मागणी होत होती. मात्र,एकाच वेळी दोन वर्षांसाठी मास्क खरेदी करण्याच्या निर्णयावरुन वाद होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

हेही वाचा- देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात; भाजपचा सरकारवर हल्लाबोल

महानगर पालिकेने गेल्या महिन्यात शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता आणि नियमित देखभालीसाठी हाऊस किपर नेमण्याच्या निविदा जाहीर केल्या होत्या. तीन वर्षांसाठीच्या या कंत्राटासाठी तब्बल 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. त्यावर शिवसेनेकडूनच आक्षेप घेतला होता.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bombay Municipal Corporation purchase 20 crore masks students Chances controversy


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bombay Municipal Corporation purchase 20 crore masks students Chances controversy