'ताज' हॉटेलचा दंड माफ तर बीएसईवर कारवाईचा बडगा,पालिका प्रशासनाकडून दुजाभाव

'ताज' हॉटेलचा दंड माफ तर बीएसईवर कारवाईचा बडगा,पालिका प्रशासनाकडून दुजाभाव

मुंबईः मुंबई महापालिकेनं मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर (बीएसई) कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र पालिकेनं ताज हॉटलेवरील तब्बल ९ कोटी रुपयांचा दंड माफ केला आहे. दरम्यान बीएसईला दोन कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश पालिकेनं दिलेत. 

१९९२च्या बॉम्बस्फोटानंतर बीएसईच्या बाहेरील पदपथ आणि पार्किंग पोलिसांनी बंद केले.  तर २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर २०१२ पासून ताज आणि ट्रायडंट पाठोपाठ 'बीएसई'लाही सार्वजनिक जागा व्यापल्याबद्दल पालिकेकडून दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.  गेल्या काही वर्षांत ताज हॉटेलने बंद केलेल्या पदपथांवर झाडाच्या कुंड्या, तसेच आपले काही साहित्य ठेवून अतिक्रमण केले आहे. पालिकेने रस्ते आणि पदपथाच्या व्यावसायिक वापरापोटी हॉटेलला ८ कोटी ८५ लाख रुपये दंड ठोठावला होता.

गेली पाच वर्षे सुरू असलेल्या या वादावर पालिकेनं अखेर दंडमाफ केला आहे. ताजने आतापर्यंत ६६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. दुसरीकडे ट्रायडंट हॉटेलला नोटिसा बजावून नमते घेण्यास प्रशासनाने भाग पाडले आहे. हॉटेलने कारवाई टाळण्यासाठी २० लाख रुपये भरून आपली सुटका करून घेतली आहे. मात्र, कारवाईत हा दुजाभाव कशासाठी, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

बीएसईला दरमहा भाड्यापोटी दोन लाख १२ हजार याप्रमाणे चार कोटी रुपये दंड, तसेच १५ टक्के व्याजापोटी ६० लाखांहून अधिक रक्कम भरण्यास सांगण्यात आली होती.  नंतर हिशेबात गोंधळ झाल्याचे स्पष्ट करून, दोन कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला. 'बीएसई'ने या प्रकरणी पालिकेला पत्र पाठवून सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरील पार्किंग आणि मोकळी जागा पोलिसांनी बंद केली आहे. सार्वजनिक हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दंड भरण्यास बीएसईने स्पष्ट नकार कळवला आहे.

bombay stock exchange illegally blocking fine bmc taj hotel Penalty forgiven

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com