esakal | Night Curfew: ५ तारखेनंतरही मुंबईतला नाईट कर्फ्यू सुरुच राहणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Night Curfew: ५ तारखेनंतरही मुंबईतला नाईट कर्फ्यू सुरुच राहणार?

नाईट कर्फ्यू वाढवायचा की नाही यावर आज  मुंबई महापालिका आयुक्तांची बैठक होत आहे.

Night Curfew: ५ तारखेनंतरही मुंबईतला नाईट कर्फ्यू सुरुच राहणार?

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः आज मुंबईतील नाईट कर्फ्यूची वेळ संपणार आहे. त्यामुळे नाईट कर्फ्यू वाढवायचा की नाही यावर आज आज मुंबई महापालिका आयुक्तांची 12 वाजता बैठक होणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त आज बैठकीत मुंबईतल्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर यावर चर्चा केली जाईल. 

या बैठकीत आयुक्त सध्याच्या स्थितीबाबतचा आढावा राज्य सरकारला कळवतील. त्यानंतर नाईट कर्फ्यू हटवायचा की लागू ठेवायचा याबाबत निर्णय घेण्यात येईल. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 23 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. याव्यतिरिक्त, युरोप आणि मध्य पूर्व देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस अनिवार्य संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आला होता. तसेच इतर देशातून येणाऱ्या नागरिकांना  होम क्वारंटाईन केलं जात आहे. या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी केली जात आहे. 

हेही वाचा- बाळासाहेब थोरात राजीनामा देणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग

त्यातच ब्रिटनहून मुंबईत येणाऱ्या प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. कालपर्यंत हा आकडा 27 वर पोहोचला होता.  नाईट कर्फ्यूदरम्यान सर्व अत्यावश्यक सेवांना परवानगी आहे. नाईट कर्फ्यूदरम्यान नागरिक दुचाकी आणि चारचाकीवरुन प्रवास करु शकतात. मात्र, चारचाकीमध्ये चारपेक्षा अधिक लोकांना प्रवास करता येणार नाही आहे. 

 mumbai night curfew mumbai police will continue bmc Commissioner meeting

loading image