सीमाभाग राज्यात सामील होणारच! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क 
Sunday, 1 November 2020

बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हा आपला निर्धार आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे.

मुंबई : बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हा आपला निर्धार आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे. मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नसल्याचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. 

शिक्षणमंत्र्यांना पदावरून हटवा! 'ट्विटर'वर पालकांचे मतदान सुरू

राज्यातील मंत्रिमंडळाने सीमाभागातील मराठी भाषकांना पाठिंबा देण्यासाठी काळ्या फिती लावून कामकाज केले. सीमाभागातील मराठी भाषक महाराष्ट्रात सामील होण्यावर ठाम आहेत. गेल्या 60 वर्षांपासून या एकाच मागणीसाठी त्यांची लढाई सुरू आहे. सीमावाद उच्च न्यायालयात असतानाही कर्नाटक सरकारकडून मराठी भाषकांवर अन्याय केला जातो. मराठी भाषकांवर दडपशाही केली जाते. महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण नागरिक त्यांच्यासोबत असून, लवकरच वादग्रस्त भागाचा राज्यात समावेश केला जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 
--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Border will join the state Deputy Chief Minister Ajit Pawars warning