esakal | बोरीवलीत पुन्हा कोरोनाचा कहर,  महिन्याभरात वाढले 3290 रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

बोरीवलीत पुन्हा कोरोनाचा कहर,  महिन्याभरात वाढले 3290 रुग्ण

उत्तर मुंबईत कोविडचा कहर पुन्हा सुरु झाला आहे. बोरीवली आर मध्य प्रभागात एका महिन्यात तब्बल 3290 रुग्णांची नोंद झाली आहे. तर,रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 53 दिवसांवरुन 42 दिवसांवर आला आहे.

बोरीवलीत पुन्हा कोरोनाचा कहर,  महिन्याभरात वाढले 3290 रुग्ण

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई: उत्तर मुंबईत कोविडचा कहर पुन्हा सुरु झाला आहे. बोरीवली आर मध्य प्रभागात एका महिन्यात तब्बल 3290 रुग्णांची नोंद झाली आहे. तर,रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 53 दिवसांवरुन 42 दिवसांवर आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत सर्वाधिक घट अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम के पश्‍चिम प्रभागात महिन्याभरात 107 दिवसांवरुन 50 दिवसांवर आला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेला मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 88 दिवसांचा होता. बुधवारपर्यंत तो 61 दिवसांवर आला आहे. तेव्हा बोरीवली प्रभागात 53 दिवसात रुग्ण दुप्पट होत होते. हा तेव्हा शहरातील सर्वात कमी कालावधी होता. बोरीवली पाठोपाठ कांदिवली आर दक्षिण प्रभागात महिनाभरात 2496 रुग्णांची वाढ झाली आहे.त्य ा खालोखाल के पश्‍चिम येथे 2321 नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. 

बोरीवली येथे बुधवारी 9517 रुग्णांची नोंद होती तर 10 ऑगस्टला 6227 रुग्ण नोंदविण्यात आले होते. त्याच बरोबर कांदिवली येथील रुग्णसंख्या 5687 वरुन 8183, दहिसर 3111 वरुन 4407,अं धेरी पश्‍चिम 6885 वरुन 9206 आणि गोरेगाव 4042 वरुन 5620 वर रुग्ण संख्या पोहचली आहे. मुलूंड टी प्रभागात गेल्या महिन्यात 5294 रुग्ण होते ते आता 7114 वर पोहचले आहेत.
 
रुग्ण दुप्पट होण्याचा घटलेला कालावधी (दिवसात )

  • प्रभाग - 10 ऑगस्टचा कालावधी - 9 सप्टेंबरचा कालावधी
  • बोरीवली - 53-42
  • गोरेगाव - 73-44
  • दहिसर - 74-47
  • मुलूंड- 77--47
  • ग्रॅन्टरोड - 58- 49
  • अंधेरी पश्‍चिम - 107-50
  • कांदिवली - 73-50

धारावीत गुरुवारी 11 नवे रूग्ण, जी उत्तर मध्ये 85 नवीन रूग्णांची भर

धारावीमध्ये गुरुवारी 11 नवीन रूग्णांची भर पडली असून एकूण रूग्णसंख्या 2850 इतकी झाली आहे.  102 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दादर मध्ये गुरुवारी 42 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 2883 इतकी झाली आहे.  444 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये 32 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 2575 इतकी झाली. तर 416 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात दिवसभरात 85 नविन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 8308 वर पोहोचला आहे.  आतापर्यंत 514 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  धारावीमध्ये 2,478, दादरमध्ये 2,337 तर माहीममध्ये 2,072 असे एकूण 6,887 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 962 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

------------

(संपादनः पूजा विचारे) 

Borivali again Corona havoc increased 3290 patients month

loading image