KRK : अभिनेता कमाल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 KRK Arrest

KRK : अभिनेता कमाल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

मुंबई : वादग्रस्त ट्विटप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता कमाल खान अर्थात केआरके याला बोरिवली कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळं केआरकेच्या अडचणीत वाढ झाली असून त्याला आता तुरुंगात रहावं लागणार आहे. (Borivali Court sends Kamal Rashid Khan to 14-day judicial custody)

काही दिवसांपासून केआरकेला अटक होणार अशी चर्चा सुरु होती. तो जेव्हा मुंबई विमानतळावर आला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. केआरके हा सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतो.

कोण आहे केआरके?

कमाल रशीद खान अर्थात केआरके हा भारतीय अभिनेता, कथा लेखक, निर्माता आहे. त्यानं सन २००९ मध्ये बिगबॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला होता. तेव्हापासून तो प्रकाशझोतात आला. देशद्रोही नावाच्या सिनेमामुळं तो बॉलिवूडमध्ये चर्चेत आला होता. हा सिनेमाची त्यानं निर्मिती देखील केली होती.

Web Title: Borivali Court Sends Kamal Rashid Khan To 14 Day Judicial Custody

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..