esakal | बोरीवलीला मिळाला भारतातील पहिला 'इको-फ्रेंडली' ट्रान्सफॉर्मर

बोलून बातमी शोधा

बोरीवलीला मिळाला भारतातील पहिला 'इको-फ्रेंडली' ट्रान्सफॉर्मर
बोरीवलीला मिळाला भारतातील पहिला 'इको-फ्रेंडली' ट्रान्सफॉर्मर
sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई: सध्याचा काळ आहे नवनवीन गोष्टीं करण्याचा म्हणजेच स्टार्ट-अप व्यवसाय करण्याचा आहे. अनेक जण छोटासा का होइना पण आपला व्यवसाय छंदा सुरू करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली असून ट्रान्सफॉर्मरवर प्रचंड ताण असतो. अशा परिस्थितीत अदानी इलेक्ट्रिसिटी बोर्डाने अत्यधुनिक असा इको-फ्रेंडली ट्रान्सफॉर्मर वापर करण्यात सुरूवात केली आहे. या ट्रान्सफॉर्मरवची खास बात म्हणजे पारंपारिक खनिज तेलाऐवजी पर्यावरणपूरक अशा इस्टर तेलावर चालणारे हे भारतातील पहिले ट्रान्सफॉर्मर आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई (AEML)तर्फे बोरीवलीत नुकताच हा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला आहे.

हेही वाचा: Breaking News! सर्वांना मोफत लस मिळणार, ठाकरे सरकारचा निर्णय

या इको-फ्रेंडली ट्रान्सफॉर्मरची क्षमता 220 केव्ही असून भारवाहन क्षमता 125 एमव्ही आहे. यात नेहमीच्या इंधनाऐवजी कृत्रिम इस्टर तेल भरलेले असल्याने आगी लागण्यासारखे प्रकार येथे घडणार नाहीत. तसेच उच्च तापमानातही तेवढीच कार्यक्षमता दाखविणारे हे रोहित्र पर्यावरणपूरक असल्याचा एईएमएल चा दावा आहे. या ट्रान्सफॉर्मरमुळे उपकेंद्राची कार्यक्षमताही वाढेल. तसेच परिसरातील पारेषण व वितरण पायाभूत सुविधा सक्षम होईल. याशिवाय बोरिवली व आजुबाजूच्या भागातील भविष्यातील भारवाढ सांभाळणे शक्य होईल. या सर्व वैशिष्ट्यांमुळे असे ट्रान्सफॉर्मर शहरी भागात वापरणे योग्य ठरते. बोरिवलीच्या 220 केव्ही अतिरिक्त हाय व्होल्टेज उपकेंद्रात हा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला आहे.

हेही वाचा: 'कोविड ड्युटीचा पहिला दिवस आजही आठवतो'; डॉक्टरांनी सांगितला अनुभव

AEML ने सध्याच्या साथीच्या दिवसांत सर्व नियम पाळून हा ट्रान्सफॉर्मर 15 दिवसांच्या विक्रमी वेळेत बसवून सुरु केला. हा ट्रान्सफॉर्मर सिमेन्सच्या कळवा युनिटने पुरवला आहे. इस्टर तेलावरील ट्रान्सफॉर्मर म्हणजे पर्यावरणपूरक व स्वच्छ अपारंपारिक इंधनापासून उर्जानिर्मिती करण्याच्या आश्वासनाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे, असे AEML च्या प्रवक्त्यांनी सांगितले. आपल्या कार्यक्षेत्रात एकूण विजेच्या तीस टक्के वीजपुरवठा अपारंपारिक उर्जास्रोतांमधून करण्याचा AEML चा प्रयत्न असणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

(संपादन- विराज भागवत)