हृदयद्रावक ! एकाच वेळी पोलिस दलात सहभागी झालेल्या जुळ्या भावांवर कोरोनाने एकत्रच घातला घाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हृदयद्रावक ! एकाच वेळी पोलिस दलात सहभागी झालेल्या जुळ्या भावांवर कोरोनाने एकत्रच घातला घाला...

कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावलेत. सर्वसामान्य नागरिक, हेल्थ वर्कर्स, डॉक्टर्स आणि पोलिस अधिकारी, कर्मचारी या सर्वांचाच यामध्ये समावेश आहे.

हृदयद्रावक ! एकाच वेळी पोलिस दलात सहभागी झालेल्या जुळ्या भावांवर कोरोनाने एकत्रच घातला घाला...

मुंबई : कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावलेत. सर्वसामान्य नागरिक, हेल्थ वर्कर्स, डॉक्टर्स आणि पोलिस अधिकारी, कर्मचारी या सर्वांचाच यामध्ये समावेश आहे. अशात स्वतःच्या जीवाची बाजी लावत रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी आणि रस्त्या-रस्त्यावर आपले पोलिस बांधव आपल्यासाठी मेहनत घेतायत. आपल्यसाठे ते स्वतःच्या जीव धोक्यात घालतायत. ही बातमी अशाच जुळ्या बांधवांची आहे जे एकाचवेळी पोलिस दलात सहभागी झाले होते आणि त्यांचा एकाच महिन्यात कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालाय.   

कोरोनाची लढाई लढताना आणि नागरिकांना सुरक्षित ठेवताना ठाण्यातील हे जुळे भाऊ कोरोनाविरुद्धच्या लढाईत शहिद झालेत. जयसिंग घोडके आणि दिलीप घोडके असं या भावांचं नाव आहे. मन सुन्न करणारी बाब म्हणजे या दोघं पोलिस बंधूंचा एक आठवड्याच्या अंतराने मृत्यू झालाय. २० जुलै रोजी दिलीप घोडके तर २८ जुलै रोजी जयसिंग घोडके यांचा कोरणामुळे आपले प्राण गमावलेत. 

मोठी बातमी मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

एकाच दिवशी पोलिस दलात झाले होते सहभागी : 

हे दोघे भाऊ एकाच दिवशी पोलिस दलात सहभागी झाले होते. यापैकी जयसिंग यांची पोस्टिंग अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात होती. ते तिथं पोलिस हवालदार पदावर कार्यरत होते. तर दिलीप घोडके हे मुंबईतील हिल लाईन पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार या पदावर कार्यरत होते. 

घरावर शोककळा : 

एकाच घरातील दोघा भावांचा एक आठवड्याच्या अंतराने मृत्यू झाल्याने घोडके कुटुंबियांवर आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दोघा बंधूंच्या पोलिस ठाण्यांमध्ये देखील हळहळ व्यक्त केली जातेय. 

both twin brothers from thane lost their lives within one week due to covid

Web Title: Both Twin Brothers Thane Lost Their Lives Within One Week Due Covid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top