मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

कोरोनामुळे सर्वच जग हैराण झालंय. अशात भारतातील मुख्य राज्य म्हणून महाराष्ट्रालाही कोरोनामुळे मोठा फटका बसलाय.

मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : कोरोनामुळे सर्वच जग हैराण झालंय. अशात भारतातील मुख्य राज्य म्हणून महाराष्ट्रालाही कोरोनामुळे मोठा फटका बसलाय. याच पार्श्वभूमीवर एका मराठी वृत्तवाहिनेने राज्यातील प्रमुख नेत्यांचं महाराष्ट्राबद्दल व्हिजन काय आहे हे जाऊन घेतलं. या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील त्यांचं महाराष्ट्राबद्दलचे विचार मांडले. राज ठाकरे यांनी कोरोनापासून अयोध्येतील राम मंदिरापर्यंत सर्व विषयांवर भाष्य केलंय. 

'आता लॉकडाउनमधून सोडवा' अशी लोकांची इच्छा :

सरकारच्या कामावर राज ठाकरे यांनी आपलं मत मांडलं. सरकार स्थापन झाल्या झाल्या कोरोना आला त्यामुळे सरकारच्या कामाबद्दल लगेच बोलता येणार नाही, असं राज ठाकरे म्हणालेत. आता लॉकडाऊन संपवला पाहिजे असं स्पष्ट मत राज ठाकरेंनी मांडलं आहे, तशी लोकांची इच्छा आहे असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.

मोठी बातमी - मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, कारण यंदा पाणी कपात अटळ... 

सध्या लोकांच्या मनातील भीती दूर करण्याची गरज आहे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यायच्या असतात, त्यांना पक्षातील लोकांशी बोलायचं नाही असाही टोला राज ठाकरेंनी लगावला. मी घराबाहेर पडलो तर गर्दी जमा होईल आणि त्यातून कोरोना फैलावु शकेल. यापेक्षा सरकारमधल्या लोकांनी मात्र घराबाहेर पडणं आवश्यक होतं, असंही राज ठाकरे म्हणालेत. 

विषाणूंसोबत जगायला शिकावं लागेल : 

लॉकडाऊन करण्याचा निर्णय चुकला का याबद्दलही राज ठाकरे यांनी आपलं मत मांडलं. सुरवातीच्या काळात लॉकडाऊन चे नियम पाळणं अत्यंत गरजेचं होतं, असं मला डॉक्टरांनी सांगितलं. आता मी काही यातला तज्ज्ञ नाही आणि WHO काही माझ्याकडून सल्ला घेत नाही असा मिश्किल टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. सुरवातीला कठोर लॉकडाऊन पाळलं गेलं नाही, आता परिस्थिती हाताबाहेर गेलीये. आता आपल्याला विषाणूंसोबत जगायला शिकायला हवं असंही राज ठाकरे म्हणालेत. 

मोठी बातमी - नियमांचा भंग केल्यास होऊ शकते जेल, गणेश विसर्जनाचे नवीन नियम वाचलेत का ?

राम मंदिराबाबत काय म्हणालेत राज ठाकरे ? 

राम मंदिर व्हावं की नाही? यामध्ये आपली कायमच मंदिर झालंच पाहिजे अशीच भूमिका होती. म्हणूनच एवढे कारसेवक अयोध्येत गेले होते, ज्याबद्दल आता खोलात जाऊन बोलायची गरज नाही. मात्र, राम मंदिर भूमिपूजन ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

मात्र राम मंदिराच्या भूमिपूजनावर राज ठाकरे यांनी वेगेळी भूमिका मांडली आहे. सध्या देशातील नागरिक वेगळ्या विवंचनेत आहेत. आता भूमिपूजन केल्यास भूमिपूजन होईल, एक दिवसाच्या बातम्याही होतील यापलीकडे लोकांना त्याचा आनंद घेता येणार नाही. त्यामुळे भूमिपूजन दोन महिन्यांनी झालं असतं तरीही चाललं असतं, भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला हवं, असंही राज ठाकरे म्हणालेत.  

MNS chief raj thackeray on implementation of lockdown and ram mandir

loading image
go to top