
आज सकाळपासून मुंबईच्या उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विलेपार्ले, सांताक्रुज यांसह विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले. मात्र मागील पंधरा-वीस मिनिटांत पावसाने थोडी उसंत घेतली आहे. यामुळे आता पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. मात्र मिठी नदीत एका मुलगा बुडाल्याचे समोर आले आहे.