बहिष्कार म्हणजे बहिष्कार! उत्सवांच्या जल्लोषात चीनी वस्तूंच्या विक्रीस नकार; वाचा बातमी

संजय घारपुरे - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जुलै 2020

सण साजरे करताना केवळ भारतीय वस्तूंचा वापर होण्यासाठी भारतातील व्यापारांनी कंबर कसली आहे. त्यासाठी या कालावधीत चीनी वस्तूंची विक्री होऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु केले आहेत. 

 

मुंबई ः काही दिवसातच देशातील सणांना सुरुवात होईल. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत श्रावण महिन्यातील सणांपासून ते दिवाळीपर्यंत विविध सण साजरे होतील. आता हे सण साजरे करताना केवळ भारतीय वस्तूंचा वापर होण्यासाठी भारतातील व्यापारांनी कंबर कसली आहे. त्यासाठी या कालावधीत चीनी वस्तूंची विक्री होऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु केले आहेत. 

"...त्यावेळी बाळासाहेबांनी आम्हाला धक्का बसेल अशी भूमिका घेतली", बाळासाहेबांबद्दल असं का म्हणालेत शरद पवार ?

गतवर्षी सणांच्या कालावधीत तब्बल वीस हजार कोटी वस्तूंची चीनमधून आयात झाली होती. यंदा याचा फटका चीनला बसावा यासाठी व्यापारी प्रयत्नशील आहेत. व्यापारी संघटनेने प्रत्येक राज्यातील व्यापारांशी संपर्क साधला आहे. आपल्या राज्यात किती आणि कोणत्या वस्तूंची निर्मीती होऊ शकेल तसेच किती आणि कोणत्या गोष्टींची मागणी असेल याची विचारणा केली आहे. आता ही आकडेवारी 15 जुलैपर्यंत एकत्रित करण्याचा विचार आहे. 

चार महिन्यांनतर शूटसाठी बाहेर पडला अर्जुन कपूर, लोकेशनवरचे फोटो केले शेअर.. - 

राखीपोर्णिमेपासून तुळशी विवाहापर्यंत देशात उत्सवाचे वातावरण असते. भारतीय वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली, त्याच्या विक्रीवर भर दिल्यास राखी पोर्णिमा, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी यासारख्या उत्सवाच्या कालावधीतील विक्रीसाठी योजना तयार होत आहे. आता त्याला वाहतूक संघटनेचीही साथ मिळाली आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी अखिल भारतीय ट्रान्सपोर्ट संघटना चीनी वस्तूंच्या वाहतूकीवर बहिष्कार टाकणार आहे असे सांगितले.

------------------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boycott Refusal to sell Chinese goods during festivals; Read the news