भिवंडीत काँग्रेस पक्षाला खिंडार! 16 नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

भिवंडीत काँग्रेस पक्षाला खिंडार! 16 नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

भिवंडी -  भिवंडी  महापालिकेच्या महापौर ,उपमहापौर पदाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा  18 नगरसेवकांनी घोडेबाजाराला बळी पडून काँग्रेस पक्षाशी दगाबाजी करून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केले.त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका राका यांचा पराभव झाला. पालिकेत काँग्रेस पक्षाचे बहुमत असतानाही नामुष्की ओढवल्याने 18 फुटीर नगरसेवकांचे पद कायमचे रद्द करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे माजी महापौर नगरसेवक जावेद दळवी यांनी नवी मुंबई कोकण विभागीय आयुक्त यांच्या कडे केल्यामुळे या नगरसेवकांना कार्यालयात बोलावून आयुक्तांनी सुनावणी व्दारे त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू केली असताना अचानकपणे आज दुपारी काँग्रेस पक्षाचे 18 पैकी 16 नगरसेवकांनी मुंबई येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असुन राजकीय गटात मोठी खळबळ उडाली आहे.

 राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली या 16 नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार खा. सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ,जयंत पाटील या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर नगरसेवक अहमद सिध्दीकी, मतलुब सरदार खान,मलिक मोमीन, अर्षद अन्सारी, अंजुम सिद्दिकी, जरीना अन्सारी,शबनम अन्सारी, नमरा औरंगजेब अन्सारी अशा विविध 16 नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. मात्र प्रवेश कार्यक्रमात नगरसेविका ऐवजी त्यांचे पती उपस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस पक्षाचे बंडखोर उपमहापौर इमरान खान व त्यांचे पत्नी मिसबा खान या बाहेर गावी असल्याने कार्यक्रमास उपस्थितीत नव्हते.

भिवंडी शहर महापालिकेत शिवसेना व काँग्रेस पक्षाची युती आहे. महापालिकेत काँग्रेस पक्षाचे 47 व शिवसेनेचे 12 नगरसेवक असल्याने बहुमत आहे.असे असताना महापौर व उपमहापौर पदासाठी 5 डिसेंबर 2019 रोजी  झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा 18 नगरसेवकांनी पक्षा आदेश झुगारून  कोणार्क विकास आघाडीच्या  महापौर पदाचा उमेदवारास मतदान केले.त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका राका  पराभव झाला.या घटनेमुळे काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली असून गटबाजीला उधाण आले आहे. काँग्रेस पक्षाचा पक्षादेश झुगारून विरोधकांना मदत करणाऱ्या 18 नगरसेवकांचे नगरसेवक पद  रद्द करण्यासाठी कोकण आयुक्तांना आदेश देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे पालिकेचे माजी महापौर जावेद दळवी, माजी सभापती प्रदीप राका यांनी  काँग्रेस पक्षाचे प्रदेशध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या कडे केली होती.त्यांनी दुर्लक्ष केल्याने या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्त आयुक्त यांच्या कडे  तक्रार करण्यात आल्याने केली होती. त्यामुळे कोकण आयुक्तांच्या आदेशावरून भिवंडी पालिकेच्या नगरसचिव विभागाने काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारणाऱ्या 18 नगरसेवकांना नोटीस बजावली होती त्यामुळे या प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे त्यांचे पद रद्द होण्याची भिती असल्याने त्यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची चर्चा आहे.

break Congress party in Bhiwandi! 16 corporators joined NCP

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com