
मुंबई : ऑगस्ट महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवापुढे कोरोनाचे संकट उभे टाकले आहे. मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळाच्या भल्या मोठ्या गणेश मूर्ती , आकर्षक देखावे, मिरवणुकीचा जल्लोष हे मुंबईच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. पण या वर्षी गणेशोत्सवातील जल्लोष पाहायला मिळेल याची आशा धुसर होत आहे.
मूर्तिकार गणपतीची मूर्ती घडवण्यासाठी तयारीत होते. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सर्वच उत्साहावर पाणी फिरले. मूर्तिकारांच्या कारखान्यात मूर्ती घडवण्याचे काम थांबले आहे. तर मोठ्या गणपतीच्या मूर्तीसाठी आवश्यक कच्चा माल आणि कामगार नसल्याने मूर्ती तयार कशा करायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत मूर्तिकारांनी ग्राहकांच्या ऑर्डर तुर्तास स्थगित केल्या आहेत. गणेशोत्सव मंडळ व मूर्तिकार राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतिक्षा करत आहेत.
गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारने अजून कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे गणेशोत्सवाबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाे अजून कोणतेही निर्णय घेतले नाही. पण सरकारचा जो निर्णय असेल त्याचे काटेकोर पालन केले जाईल, अशी मंडळांची भूमिका आहे.
लॉकडाऊनमुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊ शकली नाही त्यामुळे गणपतीच्या मूर्तीबाबत निर्णय अजून झालेला नाही. कोरोनाचे संकट बघता यावर्षी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येईल. त्यामुळे मोठ्या मूर्तींच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.
मूर्तिकार आशिष पाटकर म्हणाले, आतापर्यंत कोणतीच मूर्तीची ऑर्डर स्वीकारली नाही. चौकशीसाठी ग्राहकांचे फोन येऊन गेले. लॉकडाऊन असल्यामुळे कच्चा माल मिळत नाही तसेच कामगारही येऊ शकत नाही. त्यांची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे. मूर्ती बनवण्यासाठी येणारा कामगार उत्तर प्रदेश व मध्यप्रदेशातील असतो. त्यामुळे तो कामगार पुन्हा मुंबईत येईल का, याबबात साशंका आहे. लॉकडाऊन संपल्यावर परिस्थिती आढावा घेऊन मूर्ती बनवण्याच्या कामाबाबत निर्णय घेण्यात येईल. या वर्षी परदेशातून गणेशोत्सवासाठी गणेश मूर्तीची ऑर्डर आलेली नाही, असे पाटकर यांनी सांगितले.
मुंबईतल्या घरगुती गणेश मूर्तीं घडवण्याच्या कामास कारखान्यात सुरुवात झाली पण मोठ्या मूर्ती तयार करणाच्या कामास मात्र ब्रेक लागला आहे. मोठ्या मूर्ती तयार करण्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक असते. पण कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मोठ्या मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी पीओपी राज्यस्थान, गुजराज आणि दक्षिणेकडील राज्यातून येते. आता राज्याच्या सीमाबंद आहे. त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठी खुल्या आहे. त्यामुळे माल आणायचे तसेच पैशाची गुंतवणूक उभी करण्याचे आव्हान मूर्तिकारांसमोर उभे राहिले आहे.
या वर्षी गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यावर मंडळांचा भर राहील. गणेश मूर्तीबाबतही गणेश मूर्तिकारांच्या संघटनेच्या निर्णयानुसार निर्णय घेण्यात येईल. मंडळाच्या निर्णयामध्ये लोकहिताला प्राधान्य असेल
- स्वप्नील परब , सचिव, लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , गणेशगल्ली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.