ब्रेकिंग ! अनिल देसाई बाळासाहेब थोरातांच्या भेटीला, काँग्रेसचं नाराजीनाट्य दूर होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग ! अनिल देसाई बाळासाहेब थोरातांच्या भेटीला, काँग्रेसचं नाराजीनाट्य दूर होणार?

शिवसेना खासदार अनिल देसाई हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला गेलेत. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अर्धा तासांपासून चर्चा सुरु आहे.

ब्रेकिंग ! अनिल देसाई बाळासाहेब थोरातांच्या भेटीला, काँग्रेसचं नाराजीनाट्य दूर होणार?

मुंबई- शिवसेना खासदार अनिल देसाई हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला गेलेत. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अर्धा तासांपासून चर्चा सुरु आहे. कॉग्रेसच्या नाराजीबाबत शिवसेनेनं आता चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत काँग्रेस पक्षाला सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेसचे मंत्री नाराज आहेत. अशातच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातही काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर प्रकाश टाकण्यात आला.

मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या अग्रलेखात काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे, असं म्हटलं होतं. त्यानंतर बाळासाहेब थोरातांना शिवसेनेवर पलटवार केला होता. सामनातील लिहिलेला अग्रलेख हा अपूर्ण माहितीच्या आधारे लिहिण्यात आला असल्याचं थोरात यांनी म्हटलं. आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत आहे. हा अग्रलेख व्यवस्थित माहिती घेऊन लिहायला हवा होता. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की समाधानी होतील, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

अशोक चव्हाणांचा आरोप 

महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेस पक्षाने आपली नाराजी आता उघडपणे मांडली. त्यानंतर राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली. काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळत आहे. सरकारमधील धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना सहभाग दिला जात नसल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केला आहे. राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा एक वर्ग तीनही पक्षात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. 


ऑनलाईन शिक्षणामुळे शैक्षणिक शुल्क कमी होणार? शिक्षणमंत्र्यांनी ही दिली माहिती

काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत सोमवारी बैठक घेणार होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. दरम्यान आज खासदार अनिल देसाई हे बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला गेले असून अर्ध्या तासांपासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर काँग्रेसशी नाराजी दूर होणार का हेच आता पाहावं लागेल.

Web Title: Breaking Anil Desai Balasaheb Thorats Visit Congresss Displeasure Will Stop

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top