esakal | Breaking - अभिनेते अनुपम खेर यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking - अभिनेते अनुपम खेर यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

आता यापाठोपाठ अभिनेते अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला हे. अनुपम खेरची आई दुलारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Breaking - अभिनेते अनुपम खेर यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे - सकाळ न्युज नेटवर्क

मुंबई ः हिंदी चित्रपटसृष्टीत कोरोनाने आता शिरकाव केला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोना झाला आहे तसेच रेखाच्या बंगल्यातील एका सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिचा बंगला सील करण्यात आला आहे.

'साहब...हम फिरसे मुंबई नही आयेंगे', असं म्हणणारे श्रमिक पोटापाण्यासाठी पुन्हा मुंबईत येण्याच्या तयारीत

आता यापाठोपाठ अभिनेते अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. अनुपम खेरची आई दुलारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.  अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी सांगितले की त्यांच्या आईची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विटकरून करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. 

त्याची आई दुलारी यांना मुंबईच्या अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की,आपल्या भावाची, मेव्हणीची आणि भाचीची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. मात्र अनुपम खेर यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना तसेच अन्य मंडळींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image