50 लाखांची लाच घेणाऱ्या सायन हॉस्पिटलचे उपअधिष्ठाता राकेश वर्मा यांना अटक

50 लाखांची लाच घेणाऱ्या सायन हॉस्पिटलचे उपअधिष्ठाता राकेश वर्मा यांना अटक

मुंबई : सायन रुग्णालयात मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 50 लाख रुपये देऊन महिलेची फसवणूक केल्याच्या आरोपात कॉलेजचे 54 वर्षीय उपअधिष्ठाता राकेश वर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय विविध मेडिकल कॉलेजमध्ये सरकारी कोट्यातून प्रवेश मिळवून देत असल्याचं सांगत फसवणूक करणाऱ्या टोळीचा देखील पर्दाफाश केला आहे. 

सध्या कोरोनाची गंभीर समस्या असताना एकीकडे डॉक्टरांना देवाप्रमाणे मानलं जात आहे. डॉक्टरांना विशेष बहुमानही दिला जातो. मात्र सध्या अशाच एका डॉक्टरला फसवणूक केल्याच्या आरोपात सायन पोलिसांनी अटक केली आहे. सायन मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन देतो असं सांगत 50 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा सायन पोलिस स्टेशनमध्ये नोंदवला गेला आहे.  यासंदर्भात तक्रार नोंदविल्यानंतर सायन मेडिकल कॉलेजचे उपअधिष्ठाता राकेश वर्मा यांच्या बँकेच्या खात्या संदर्भात तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. 

राकेश वर्मा यांना सायन पोलिस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली.  50 लाखांच्या फसवणूक केल्या संदर्भात अनेक मुद्दे बाहेर आले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र राकेश वर्मा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सायन रुग्णालयांमध्ये सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय मुंबईतील नामांकित मेडिकल कॉलेजेसमध्ये सरकारी खात्यातून ॲडमिशन करून देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या आणखीन एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही टोळी लोकांकडून पैसे घेऊन सरकारी खात्यातून त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन देणार असल्याचे सांगत फसवत होती. अखेर या टोळीतील सदस्यांना अटक केली गेलीये.

कोरोनाच्या काळात सध्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या बाबी समोर येत आहेत. अशातच सायन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे सतर्क राहणं किती महत्त्वाचा आहे हे दिसून येतंय.

bribe of 50 lacs taken by student vice dean of Sion hospital under arrest by mumbai police

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com