esakal | बुधवार ठरला मुंबईतील आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस, तापमान 15.8 अंशापर्यत घसरले
sakal

बोलून बातमी शोधा

बुधवार ठरला मुंबईतील आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस, तापमान 15.8 अंशापर्यत घसरले

मुंबईत थंडीचा जोर वाढत असून बुधवार आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस नोंदवण्यात आला आहे.

बुधवार ठरला मुंबईतील आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस, तापमान 15.8 अंशापर्यत घसरले

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई:  मुंबईत थंडीचा जोर वाढत असून बुधवार आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस नोंदवण्यात आला आहे. सांताक्रुझ वेधशाळेने नोंदवलेल्या तापमानानुसार बुधवारी तापमान 15.8 अंशा सेल्सिअस इतकं कमी नोंदवले गेले. मंगळवारी तापमान 16 अंश सेल्सियस इतकं होतं. तर कुलाबा वेधशाळेत 19.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, बुधवारी तापमान कमी असेल हे या आधीच वेधशाळेने स्पष्ट केलं होतं आणि येत्या काही दिवसात तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. शहरात सगळ्यात कमी तापमान 14.5 अंश सेल्सिअस हे गोरेगावसह पवई आणि पनवेलमध्ये देखील पारा 15 अंशांच्या खाली होता.

बुधवारी सांताक्रुझमध्ये कमाल तापमान 36.3 अंश सेल्सिअस आणि कुलाब्यात पारा 30.7 इतका नोंदवला गेला. एकीकडे तापमानात घट होत असताना प्रदूषणात मात्र वाढ होत असल्याचे चित्र आहे.

अधिक वाचा-  नाईट कर्फ्यू दरम्यान गाडी फिरवणाऱ्या वाहन चालकांना मुंबई पोलिसांचा इशारा
 

सफर संस्थेने नोंदवलेल्या अहवालानुसार, बुधवारी मुंबईची हवेची गुणवत्ता दर्जा 249 एक्युआय एवढा नोंदवला गेला तर सोमवारी हवेची गुणवत्ता 183 एक्यूआय नोंदली गेली जिचा दर्जा चांगला होती. हवेची गुणवत्ता 201 ते 300 च्या दरम्यान नोंदवली गेल्यास हवा प्रदूषित किंवा खराब दर्जाची असल्याची नोंद केली जाते. अशावेळी हृदय आणि फुफुसाचे विकार असणाऱ्या लोकांनी किंवा तसेच वयोवृद्ध लोकांनी जास्त व्यायाम किंवा दगदग करू नये तसेच, सुदृढ लोकांना देखील थोडाफार त्रास होऊ शकतो. 

सफरने मुंबईतील 10 ठिकाणांच्या हवेची चाचणी केली असून माझगाव वरळी तसेच नवी मुंबई येथील हवेची गुणवत्ता 300हून अधिक असल्याचं समोर आलं जी अतिशय खराब वर्गात मोडते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai weather update Wednesday dips lowest winter chills

loading image
go to top