Rutuja Latke: ऋतुजा लटकेंवर लाच, भ्रष्टाचाराचे आरोप; मुंबई महापालिकेचं हायकोर्टात उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latke_BMC

Rutuja Latke: ऋतुजा लटकेंवर लाच, भ्रष्टाचाराचे आरोप; मुंबई महापालिकेचं हायकोर्टात उत्तर

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा लिपिकपदाचा राजीनामा मुंबई महापालिकेनं का स्विकारलेला नाही, असा सवाल हायकोर्टानं विचारला होता. त्यावर उत्तर देताना पालिकेनं स्पष्ट केलं की, लटके यांच्यावर लाच घेतल्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणांची चौकशी सुरु आहे.

हेही वाचा: Vande Bharat: 'वंदे भारत'ची सुरु होणार सुपरफास्ट पार्सल सेवा; पहिल्यांदा धावणार दिल्ली-मुंबई मार्गावर

दुपारी जेवणाच्या ब्रेक नंतर हायकोर्टात पुन्हा सुनावणीला सुरुवत झाली. यावेळी महापालिकेनं हायकोर्टाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, ऋतुजा लटकेंविरोधात एक तक्रार असून ती अद्याप प्रलंबित आहे. एका तक्रारदारानं लटकेंच्या विभागीय चौकशीची मागणी केली आहे. लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी आम्ही करत आहोत. शिवाय लायसनिंगच्या एका प्रकारात त्यांनी लाच मागितल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. त्यामुळं मुंबई महापालिके युक्तीवाद करत आहे की आम्ही त्यांचा राजीनामा मंजूर का केलेला नाही.

हेही वाचा: Vande Bharat: 'वंदे भारत'ची सुरु होणार सुपरफास्ट पार्सल सेवा; पहिल्यांदा धावणार दिल्ली-मुंबई मार्गावर

दुसरीकडे महापालिकेनं म्हटलं आहे की, लटकेंविरोधातील चौकशी सुरु राहिलं तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुम्ही भरु शकता तो तुमचा निर्णय आहे. पण लटकेंच्यावतीनं सांगण्यात येत आहे की जोपर्यंत माझा राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत मी अर्ज भरु शकत नाही. विशेष म्हणजे लटके यांच्याविरोधात जी तक्रार दाखल झाली आहे, ती कालच दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे.

टॅग्स :Mumbai NewsShiv Sena