Thur, March 23, 2023

BMC Budget 2023 : मुंबईकरांसाठी महत्त्वाचा दिवस; आज सादर होणार महापालिकेचा अर्थसंकल्प
Published on : 4 February 2023, 2:24 am
देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेचा 2023-24 चा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महापालिकेच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक मांडणार आहे.
महापालिकेचे आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे सर्व मुंबईकरांचे लक्ष याकडे लागले आहेत. विषेश म्हणजे हा अर्थसंकल्प येत्या निवडणुकीआधी सादर केला जात असल्यामुळे सर्वच पक्षांची धकधूक वाढली आहे.
त्यामुळे राजकीय पक्षांचे हे डोळे या अर्थसंकल्पाकडे लागले आहेत. मुंबईकरांच्या काय अपेक्ष आहेत आणि त्यांना या बजेटमधून नेमकं काय मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मागील काळात नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च 2022 ला संपल्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त हेच प्रशासक म्हणून काम पाहतात आहेत.