ऐन लगीनघाई असताना होत्याचं नव्हतं झालं; लालबागच्या स्फोटात नवरी मुलगी मात्र सुखरूप

ऐन लगीनघाई असताना होत्याचं नव्हतं झालं; लालबागच्या स्फोटात नवरी मुलगी मात्र सुखरूप

मुंबई - शहरातील लालबाग येथील साराभाई इमारतीतील बंद खोलीत घरघुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात 13 जण होरपळून जखमी झाले आहेत. येथील एका कुटूंबात लग्नघाई सुरू होती. त्यांच्या घरातील बाप लेकांवर कठीण प्रसंग ओढावला आहे. ते दोघेजण 50 टक्के भाजले आहेत. तर नवरी मुलगी आणि तिची आई सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (huge explosion of cylinder in lalbagh) त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. 

लालबागच्या या घरात आज येथील एका कुटूंबात मुलीच्या हळदीचा कार्यक्रम होता. 9 तारखेला या मुलीचं लग्न होतं.  परंतु त्याआधीच या कुटूंबावर संकट कोसळले आहे. तिचा भाऊ आणि वडील मात्र या स्फोटात जबर जखमी झाले आहेत. स्फोटामुळे ते 50 टक्के भाजले गेले आहेत. दरम्यान स्फोटाची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी 20 जखमींची भेट घेतली आहे. 

नक्की काय घडले ?

: मुंबईतील लालबाग भागात सिलिंडरचा ब्लास्ट होऊन मोठा अपघात झालाय. सदर घटना लालबागमधील गणेशगल्ली भागात घडलीआहे. दुर्घटनेची माहिती समजताच अग्निशमनदलाच्या दोन गाड्या आणि दोन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झालेत. या भीषण दुर्घटनेमध्ये तब्बल २० जण जखमी झाले आहेत.  

घटनास्थळी अग्निशमनदलाकडून पुढील कारवाई सुरु आहे. दरम्यान काही स्थानिकांकडून देखील घटनास्थळी बचावकार्य केलं गेलं आहे. स्थानिकांनी जखमी नागरिकांना रुग्णालयात दखल करण्यास मदत केली आहे. जखमी नागरिकांना मुंबईतील KEM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com