esakal | सुशांत सिंह प्रकरण: बिहारमधून आलेल्या अधिकाऱ्यांबद्दल महापालिकेने दिली अत्यंत महत्त्वाची माहिती, म्हणालेत...
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांत सिंह प्रकरण: बिहारमधून आलेल्या अधिकाऱ्यांबद्दल महापालिकेने दिली अत्यंत महत्त्वाची माहिती, म्हणालेत...

महानगरपालिकेच्या पथकाने, बिहार येथून आलेल्या या अधिकाऱ्यांना देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तिंसाठी लागू असलेली होम क्वारंटाइन बाबतची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली.

सुशांत सिंह प्रकरण: बिहारमधून आलेल्या अधिकाऱ्यांबद्दल महापालिकेने दिली अत्यंत महत्त्वाची माहिती, म्हणालेत...

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात तपस करण्यासाठी बिहारमधून मुंबईतील गोरेगांवमध्ये आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने थेर क्वारंटाईन केले, या आशयाच्या काही बातम्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाल्यात. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली 

बिहार राज्यातून आलेले पोलिस अधिकारी मुंबईतील गोरेगांव पूर्वमधील राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ) ग्रुप ८ विश्रामगृहात मुक्कामी आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभाग कार्यालयाकडे प्राप्त झाली. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने, त्यांना कोविड १९ संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार होम क्वारंटाइन करणे आवश्यक असल्याने महानगरपालिकेचे पथक काल (दिनांक २ ऑगस्ट २०२०) सायंकाळी सदर विश्रामगृहावर पोहोचले.

मोठी बातमी - 'सत्ता गेल्यानं विरोधकांची डोकी कामातून गेली', शिवसेनेची भाजपवर घणाघाती टीका

महानगरपालिकेच्या पथकाने, बिहार येथून आलेल्या या अधिकाऱ्यांना देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तिंसाठी लागू असलेली होम क्वारंटाइन बाबतची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. राज्य शासनाचे दिनांक २५ मे २०२० रोजीचे आदेश क्रमांक डिएमयू/२०२०/सीआर ९२/डिएसएम १ अन्वये देशांतर्गत विमान प्रवास करणाऱया व्‍यक्तिंसाठी नियमावली ठरवून देण्यात आली असून त्यामध्ये गृह अलगीकरणाचा देखील समावेश आहे, त्याची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली.

मोठी बातमी - शाब्बास BMC....शहरातील तेरा सिग्नलवरील पुरुषांऐवजी महिलांचे चित्र लावणार! वाचा सविस्तर 
 

त्यासोबतच, त्यांना माहिती देण्यात आली की, राज्य शासनाच्या नियमावलीनुसार, गृह अलगीकरणातून सूट मिळण्यासाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडे नियमावलीनुसार अर्ज करणे आवश्यक आहे.  

( संपादन - सुमित बागुल )

bruhanmumbai municipal corporation released information about bihar cop vinay tiwari in SSR case