मुंबई
Mumbai Animal Cruelty Case: मुंबईत अमानुष कृत्य! अडीच महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लावर लैंगिक अत्याचार, आरोपीला अर्धनग्न अवस्थेत अटक
Mumbai Animal Cruelty Case: What the Law Says and Why It Matters : मुंबईत कळस गाठलेली क्रूरता! अडीच महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लावर लैंगिक अत्याचार, आरोपी अर्धनग्न अवस्थेत अटकेत
मुंबईच्या मालाड पूर्व भागातील कुरार गावात एक अत्यंत अमानवीय आणि राग येणारी घटना समोर आली आहे. येथे एका २० वर्षीय तरुणाने अडीच महिन्यांच्या निरागस श्वानाच्या पिल्लावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेने प्राणीप्रेमी समाजात तीव्र असंतोष पसरला असून, मुक्या जीवांवर होणाऱ्या क्रूरतेवरून सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात आरोपीला अर्धनग्न स्थितीत पकडण्यात आले असून, त्याच्यावर कडक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

