लोकवर्गणीतून साकारली पोस्टाची इमारत

dombivali
dombivali

डोंबिवली : भारतीय डाक कार्यालयाचे दहिसर येथील नूतन कार्यालयाचे सोमवारी दुपारी उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागात दिवसेंदिवस पोस्टाची सुविधा ही वेळेवर होत नसताना जीर्ण व धोकादायक झालेल्या जागेमुळे अनेक महिने बंद राहिलेले पोस्ट आता दहिसर येथील नागरिकांसाठी सुरु करण्यात आले आहे.

मागील काही वर्षांपासून दहिसर येथील पोस्टाच्या कार्यालयाची इमारत अत्यंत जीर्ण झाली होती. त्यासाठी शिवसेनेने वारंवार नवीन इमारत तयार करण्यासाठी मागणी करून सुध्दा पोस्ट खात्याकडून चालढकल करण्यात येत होती तेव्हा आम्ही लोकवर्गणीतून गावासाठी पोस्ट बांधून देऊ असे वचन सेनेने दिले होते. त्यानुसार पोस्टाच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केल्यावार त्यांनी परवानगी दिली होती.

पावसाळ्यात पोस्टाच्या कार्यालयात पावसाचे पाणी, साप, जनावरे जात असल्याने कर्मचारी आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अखेर लोकवर्गणी गोळा करून शिवसेनेने जीर्ण झालेली शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण केले. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीचे गांभीर्य लक्षात घेऊन युवा सेनेचे शाखा अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांच्या पुढाकाराने आज ह्या इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या इमारतीचे उद्घाटन शीळ डायघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतीय पोस्ट कार्यालयाचे अधिकारी .डोंगरे  जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, ग्राम पंचायत सदस्य भरत भोईर तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com