मुंबई महापालिकेकडून 'या' भागातल्या तब्बल 790 इमारती सील

मुंबई महापालिकेकडून 'या' भागातल्या तब्बल 790 इमारती सील

मुंबई- कोरोना व्हायरसचा मुंबईत कहर सुरुच आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाचा प्रसार आणखी उद्धवभू नये म्हणून पालिका दाटीवाटीच्या ठिकाणी एखादा कोरोना रुग्ण आढळल्यास संबंधित परिसर सील करते. या नियमानुसार महापालिकेनं मुंबईतल्या तब्बल 790 इमारती सील केल्याची माहिती समोर आली आहे. तसंच मालाड, गोरेगाव भागात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्यानं संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात इमारती सील करण्यात येत आहेत.

मुंबईच्या या भागात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता

या भागांमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6595 पर्यंत पोहोचली आहे. अंधेरी, मालाडमध्ये रुग्णसंख्येनं 2,500 चा आकडा ओलांडला आहे. तर गोरेगावमधील रुग्णसंख्या 1500 च्या उंबरठ्यावर आहे. धारावीसदृश स्थिती मालाडमध्ये निर्माण झाल्याचं चित्र आहे. अंधेरी, मालाड, गोरेगाव परिसरात अद्याप रुग्णांची संख्या घटलेली नाही. मालाड, मालवणी, आप्पापाडा या भागात झोपडपट्टी वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर गोरेगावातील काही भागांमध्ये रुग्णसंख्या दुपटीचा वेग अधिक आहे.

पालिकेकडून युद्ध पातळीवर काम सुरु

मुंबई पालिकेकडून वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या भागांमध्ये अधिकाधिक चाचणी करण्यावर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे, चिंचोळे रस्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरणाचे काम देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोरोनाबाधितांकडून सर्वसामान्यांना होणारा संसर्ग रोखण्यासाठी इमारतीचे निर्जंतुकीकरण करणे, बाधितांच्या थेट संपर्कात असणाऱ्यांच्या ये-जा करण्यावर अंकुश ठेवणे, घरोघरी तपासणी करणे, असे उपाय सध्या पालिकेकडून करण्यात येत आहेत.

दरम्यान मे महिन्यात मुंबईतील सीलबंद इमारतींची संख्या दुपटीनं वाढली. 23 मे रोजी सीलबंद इमारतींचा आकडा 2,533 वर पोहोचला होता. 14 दिवसांच्या क्वांरटाईनंतर सोडण्यात आलेल्या इमारतींची संख्या यात समाविष्ट नाही आहे. याच काळात झोपडपट्ट्यांमधील कंटेन्मेंट झोनची (CZ) संख्या 692 वरून 644 वर गेली होती. या कालावधीत सीलबंद इमारतींची संख्या 1,262 ने वाढली. 14 मे पर्यंत 1,271 इमारती सीलबंद करण्यात आल्या त्यापैकी काही 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या इमारतींवर सील काढण्यात आलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com