नागोठणे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून नागोठण्याजवळील कोलेटी गावाच्या हद्दीत बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला.
कारमधील चारही प्रवासी तत्काळ कारबाहेर निघाल्याने जीवितहानी टळली. हा अपघात मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला.

मोठी बातमी : १० रुपयांच्या थाळीला आधारसक्ती
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणहून मुंबईला जाणारी टोयोटा कार कोलेटी गावानजीक कारली फाटा हद्दीत आली असता इंजिन गरम होऊन त्यामधून अचानकपणे धूर येऊ लागला. त्यामुळे चालकाने कार थांबविली. आणि प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर थोड्याच वेळात संपूर्ण कारने पेट घेतला.
वाहनमालक मसूद अहमद सिद्दीकी (रा. मुंबई), तसेच इतर प्रवासी सुखरूपपणे बाहेर पडले. आग विझविण्यासाठी वडखळ पोलिस ठाण्याकडून जेएसडब्लू कंपनीच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आले होते. महामार्गावर याच हद्दीत दोन दिवसांपूर्वी कार व एसटी बसचा अपघात होऊन चार जण ठार झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा पुढील तपास वडखळ पोलिस करीत आहेत.