माणगाव जवळ एसटी बसला अपघात 22 प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

मुंबई परळ येथून दापोली कडे जाणारी एसटी बस मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव जवळील कळमजे पुलावरून  खाली कोसळून झालेल्या अपघातामध्ये 22 प्रवासी जखमी झाले आहेत .त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. आज पहाटे 5.30 वाजताचे सुमारास हा अपघात घडला.

महाड - मुंबई परळ येथून दापोली कडे जाणारी एसटी बस मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव जवळील कळमजे पुलावरून  खाली कोसळून झालेल्या अपघातामध्ये 22 प्रवासी जखमी झाले आहेत .त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. आज पहाटे 5.30 वाजताचे सुमारास हा अपघात घडला.

मोठी बातमी - मुंबई 'नाईट लाईफ'वर अमृता फडणवीस म्हणतात...

दापोली  आगाराची एस.टी.क्रं. MH14-BT-0143 या क्रमांकाची ही बस मुंबई परळ येथून दापोलीकडे निघालेली होती. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव  नजीक कळमजे पुला जवळही बस आली असता चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पुला वरून खाली पलटी झाली. यामुळे या एकदम प्रवास करणारे 22 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.

मोठी बातमी - "हिंदुत्वाच्या मुद्यावर बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर"

या सर्व प्रवाशांना  तत्काळ  खाजगी वाहनातून व पोलीस वाहनातून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, माणगांव येथे दाखल करण्यात आले आहे जखमीमध्ये जयश्री माने, वंदना जळगावकर, अमिता महाडिक, अरुण महाडिक, सावित्री पाटणे, सुरेश पाटणे, विनया महाडिक, लता जाधव, दत्तात्रय मोरे, सुधाकर कदम, सुनील साबळे, विमल जोधळे यांचा समावेश आहे. यातील काही जखमी प्रवाशांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र सध्या  माणगाव पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली आहे. अपघात झालेला कळमजे पूल हा जुना पूल असून या ठिकाणी यापूर्वी अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत.

bus accident near mangaon 22 injured two serious 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bus accident near mangaon 22 injured two serious