"हिंदुत्वाच्या मुद्यावर बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर"

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 January 2020

मुंबई - शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. राज ठाकरे यांना त्यांचा मुद्दा रेटण्याचा अधिकार आहे. मात्र हिंदू हृदयसम्राट आणि त्यांचं हिंदुत्त्व पेलणे हा काही येड्या गबाळ्याचा खेळ नाही, अशा शब्दात सामानातून टीका करण्यात आली आहे. दोन झेंड्याची योजना ही म्हणजे गोंधळलेली मनस्थिती किंवा घसरलेल्या गाडीचं लक्षण असल्याचं संजय राऊत याणी सामानातून म्हटलंय. याचसोबत राज ठाकरे यांच्या विचारधारेमागे भाजपाची खेळी असल्याचा आरोप सामानातून करण्यात आलाय. 

यावर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. "आधुनिक अफजल खानानी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात. काळजी करू नका आम्हीच उपचार करू, असं संदीप देशपांडे म्हणालेत. 

मोठी बातमी - मुंबई 'नाईट लाईफ'वर अमृता फडणवीस म्हणतात...

मोठी बातमी -  पत्नीला घरात परपुरुषासोबत पाहिलं; अन्...त्याचाच झाला गेम..

याबद्दल अधिक बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सामानातील टीकेला प्रत्युत्तर दिलंय. फेकाडे सामनाकार यांनी आमच्यावर टीका करण्याचं कारण नाही. शिवसेनेने मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नागरिकांच्या पाठीत सुरा खुपसला आहे. याच गोष्ट्टीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोट ठेवण्याने त्यांना जुलाब झालेत. संजय राऊत हे माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासोबर जाणं हे येड्या गाबाळ्याचे काम नाही म्हणाले आहेत, आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत. म्हणूनच हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने सोडला. ज्यांनी डोळ्यावर हिरवा गॉगल लावलाय त्यांनी आम्हाला शिकवू नये. महाराष्ट्राचे नवे हिंदुहृदयसम्राट माननीय राज ठाकरेच आहेत असं देखील संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. 

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

mns leader sandeep deshpande replies to the editorial of samana written by sanjay raut

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns leader sandeep deshpande replies to the editorial of samana written by sanjay raut