
मुंबई : खादी ग्रामोद्योग मंडळाने ८०० कोटी मधमाशा दिल्या
मुंबई : शेतातील पिकांच्या परागीकरणासाठी अत्यंत महत्वाच्या अशा ८०० कोटी मधमाशांची भर खादी ग्रामोद्योग मंडळाने आतापर्यंत निसर्गात घातली असल्याची माहिती नुकतीच जागतिक मधमाशी दिनानिमित्त देण्यात आली. आयोगाने सन २०१७ मध्ये सुरु केलेल्या मधमाशीपालन कार्यक्रमात देशातील बेरोजगारांना एक लाख सत्तर हजार मधमाशी पेट्या दिल्या. या कार्यक्रमाचे आता चांगले परिणाम दिसून येत असल्याचेही आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना आपल्या व्हिडियो संदेशात म्हणाले. मुंबई येथील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीता वर्मा होत्या.
मधमाशीपालन हा व्यापक उपक्रम असून लाखो मधमाशीपालनकर्ते त्यांच्या उपजीविकेसाठी मधमाशांवर अवलंबून असतात. जंगलात आणि शेतीमध्ये परागीभवन करण्याबरोबरच, मधमाश्या जैवविविधता राखण्यात, अनेक वनस्पतींचे अस्तित्व आणि पुनरुत्पादन सुनिश्चित करण्यात, वनीकरणास साह्य करण्यात, टिकाऊपणा आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्यात, कृषी उत्पादनांचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारण्यात मोठी भूमिका बजावतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली. मधमाशा नष्ट झाल्या तर शेतातील पिकांचे परागीकरण बंद होऊन धान्यांची कणसे येणारच नाहीत व मानवजातच नष्ट होऊ शकते, असाही इशारा जाणकारांनी दिल्याचा दाखलाही देण्यात आला.;शेतातील पिकांच्या परागीकरणासाठी अत्यंत महत्वाच्या अशा ८०० कोटी मधमाशांची भर खादी ग्रामोद्योग मंडळाने आतापर्यंत निसर्गात घातली असल्याची माहिती नुकतीच जागतिक मधमाशी दिनानिमित्त देण्यात आली.
आयोगाने सन २०१७ मध्ये सुरु केलेल्या मधमाशीपालन कार्यक्रमात देशातील बेरोजगारांना एक लाख सत्तर हजार मधमाशी पेट्या दिल्या. या कार्यक्रमाचे आता चांगले परिणाम दिसून येत असल्याचेही आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना आपल्या व्हिडियो संदेशात म्हणाले. मुंबई येथील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीता वर्मा होत्या. मधमाशीपालन हा व्यापक उपक्रम असून लाखो मधमाशीपालनकर्ते त्यांच्या उपजीविकेसाठी मधमाशांवर अवलंबून असतात. जंगलात आणि शेतीमध्ये परागीभवन करण्याबरोबरच, मधमाश्या जैवविविधता राखण्यात, अनेक वनस्पतींचे अस्तित्व आणि पुनरुत्पादन सुनिश्चित करण्यात, वनीकरणास साह्य करण्यात, टिकाऊपणा आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्यात, कृषी उत्पादनांचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारण्यात मोठी भूमिका बजावतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली. मधमाशा नष्ट झाल्या तर शेतातील पिकांचे परागीकरण बंद होऊन धान्यांची कणसे येणारच नाहीत व मानवजातच नष्ट होऊ शकते, असाही इशारा जाणकारांनी दिल्याचा दाखलाही देण्यात आला.
Web Title: Business News Khadi Village Industries Board 800 Crore Bees Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..